सप्तकुंड धबधब्याने पालटले अजिंठा लेणी परिसराचे रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:20 IST2017-08-22T17:17:42+5:302017-08-22T17:20:52+5:30
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने लेणी परिसर हिरवाईने नटला आहे.

सप्तकुंड धबधब्याने पालटले अजिंठा लेणी परिसराचे रुप
लोकमत ऑनलाईन वाकोद जि. जळगाव, दि.22 : महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने चिंतेचे सावट दूर झाले आहे. या पावसाने प्रथमच नदी- नाले ओसंडून वाहू लागल्याचे सुखद चित्र निर्माण झाले आहे. आभाळमाया अशी सर्वदूर बरसल्याने जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील डोंगर द:याही हिरवा शालू नेसून नटल्या आहेत. तसेच अजिंठा डोंगररांगामधून वाहणा:या छोटय़ा- मोठय़ा नद्या- नाले प्रवाहीत झाले आहेत. ते फेसाळत, खळखळून वाहू लागले आहे. अजिंठा लेणीतील अप्रतिम चित्र आणि शिल्प यांच्यासोबतच पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहत असून पर्यटक त्याठिकाणी देखील गर्दी करीत आहेत.