मध्यरात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:21 IST2018-04-14T13:21:20+5:302018-04-14T13:21:20+5:30

मध्यरात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ वाजता रेल्वे स्टेशननजीक डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यानजीक ढोलताशांच्या प्रचंड गजरात डॉ.बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली. विविध संघटनांकडून डॉ.बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, मुले व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसर गर्दीने फुलला होता.