जळगावात अग्नीतांडव, पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासह १४ घरे जळून खाक, सहा बक-या, २० कोंबड्या होरपळून मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:06 IST2018-03-23T13:06:43+5:302018-03-23T13:06:43+5:30

मध्यरात्रीचा थरार

In Jalgaon fire broke | जळगावात अग्नीतांडव, पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासह १४ घरे जळून खाक, सहा बक-या, २० कोंबड्या होरपळून मृत्यूमुखी

जळगावात अग्नीतांडव, पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासह १४ घरे जळून खाक, सहा बक-या, २० कोंबड्या होरपळून मृत्यूमुखी

ठळक मुद्देसंसारोपयोगी साहित्य जळून खाकरोख ४० हजार रुपये जळून खाक

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २३ - जळगाव शहरात वेगवेगळ््या दोन ठिकाणी लागलेल्या आगीत १४ घरे जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजे दरम्यान घडली. या आगीमध्ये सर्व जणांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
शहरातील खुबानगर भागात गुरुवारी मध्यरात्री अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या ठिकाणी पत्रे व फळ््यांचे १३ घरे जळून खाक झाले. या १३ पैकी ११ घरांमध्ये वास्तव्य होते. त्या सर्वांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक होण्यासह सहा बकºया, २० कोंबड्या होरपळून मृत्यूमुखी पडल्या.
दुसºया एका घटनेमध्ये पोलीस मुख्यालयानजीक असलेल्या एका घरातही रात्री अडीच वाजेच्या सुमारास आग लागली. पोलीस आॅफिसर्स क्लबमध्ये व्यवस्थापक असलेल्या सुरेश लक्ष्मण राजपूत हे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना अचानक आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य, रोख ४० हजार रुपये जळून खाक झाले.

Web Title: In Jalgaon fire broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.