जळगाव शहरात रिक्षा चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 17:10 IST2018-03-03T17:10:31+5:302018-03-03T17:10:31+5:30
कांचन नगरातील रहिवासी बाबू कासम गवळी (वय ४०) या प्रौढाने राहत्या घरात रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

जळगाव शहरात रिक्षा चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ३ : कांचन नगरातील रहिवासी बाबू कासम गवळी (वय ४०) या प्रौढाने राहत्या घरात रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
बाबू गवळी हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होते. कांचन नगरातील रेल्वे लाईनवरील सात खोल्या परिसरात ते वास्तव्याला होते. मुलगा समीर हा भाड्याची रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावतो. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्या नैराश्यातून गवळी यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली आहे. घरात कोणी नसताना गवळी यांनी आत्महत्या केली. शेजारच्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा समीर तसेच मुलगी सिमरन असा परिवार आहे.