Ganesh Chaturthi 2018 : जळगावात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:42 IST2018-09-15T11:57:51+5:302018-09-15T12:42:19+5:30
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष

Ganesh Chaturthi 2018 : जळगावात दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
जळगाव : शहरात गुरुवारी गणरायाची सर्वत्र जल्लोषात स्थापना झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गणेशोत्सवात काही भक्त दीड दिवस, पाच दिवस तर बहुतांश जण संपूर्ण १० अथवा ११ दिवस गणरायाची स्थापना करीत असतात. गुरुवारी लाडक्या गणरायाचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. दीड दिवसांची स्थापना केलेल्या गणेशभक्तांनी शुक्रवारी सकाळी मनोभावे पूजा करीत गणरायाला महानैवैद्य दाखविला व दुपारनंतर गणरायाचे मेहरुण तलावात विसर्जन केले.
यासाठी मेहरूण तलावावर अनेक जण सहकुटुंब गणरायाला निरोप देण्यासाठी आले होते. तलावानजीक गणरायाची लहान मुलांच्याहस्ते आरती करून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष मेहरूण तलावावर बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही केला.