जळगावात आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता पुरस्काराचे थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:42 IST2017-07-30T13:41:18+5:302017-07-30T13:42:55+5:30
दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन यांना आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता अवार्ड

जळगावात आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता पुरस्काराचे थाटात वितरण
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - रतनलाल बाफना फाउंडेशनतर्फे दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेद महाजन यांना आचार्य हस्ती अहिंसा कार्यकर्ता अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े कांताई सभागृहात रविवारी सकाळी हा वितरण सोहळा थाटात पार पडला़ याप्रसंगी व्यासपीठावर शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलुभाऊ जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार सुरेश भोळे, नवरतनमल कोठारी, मोफतराज मुणोत, शौर्य शुक्ला, पारसमल हिरावत, सुमेरसिंह बोथरा, राजकुमार गोलेच्छा, ईश्वरलाल ललवाणी, पुरणमल अबाणी उपस्थित होत़े आई सुमती महाजन व कुटुंबीयांसह यजुर्वेद महाजन यांनी हा पुरस्कार स्वीकारला़ सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व पाच लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आह़े हा पुरस्कार माझा नसून मी ज्यांच्यासोबत काम करतो, अशा सहकारी तसेच मनोबल केंद्रातील प्रज्ञाचक्षू, दिव्यांग या सर्वाचा असल्याचे पुरस्काराला उत्तर देताना यजुर्वेद महाजन यांनी सांगितल़े