विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:15 IST2018-05-25T13:15:04+5:302018-05-25T13:15:04+5:30

विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २५ - कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन केलेल्या गणेश रामदास पाटील (४०, रा. बºहाणपूर) या शेतकºयाचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
कर्ज वाढत गेल्याने गेल्या आठवड्यात गणेश पाटील या शेतकºयाने बºहाणपूर येथेच विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा अखेर मृत्यू झाला.