सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 20:38 IST2017-09-25T20:34:39+5:302017-09-25T20:38:41+5:30
राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.

सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अपघातातील जखमीचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि २५: : राष्टÑीय महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ भरधाव वेगाने जाणाºया एस.टी.बसने उडविलेल्या अमृत माणिक बडगुजर (वय ४८ रा. वाटीकाश्रमाजवळ, जळगाव, मुळ रा.कढोली, ता.एरंडोल) यांचा सोमवारी सायंकाळी पाच वाजता उपचार सुरु असताना खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आता या घटनेत वाहन चालकावर पोलिसांनी ३०४ (अ) हे वाढीव कलम लावले आहे.
बडगुजर हे १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मू.जे.महाविद्यालय परिसरात शिकवणीला गेलेल्या मुलीला घेण्यासाठी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.बी.११४२) महामार्गावरुन येत असताना जळगाव आगाराच्या जळगाव -पळसोद या एस.टी बसने (क्र.एम.एच.१२ बी.टी.०४१७) विरुध्द दिशेने समोरुन ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली होती. त्यात बडगुजर गंभीर जखमी झाले होते. त्या दिवसापासून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, एस.टी.बसचालक बळवंत रामदास साळुंखे (रा.किनोद, ता.जळगाव) यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी गिरधर निकम यांनी दिली. अमृत बडगुजर हे बांभोरी परिसरातील बॉश्च कंपनीत कामगार पुरवित होते.