ओळखीचा गैरफायदा घेत जळगावात विवाहितेशी अश्लिल वर्तन करणा-यास चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:03 IST2017-11-24T13:03:18+5:302017-11-24T13:03:42+5:30
आरोपीला अटक

ओळखीचा गैरफायदा घेत जळगावात विवाहितेशी अश्लिल वर्तन करणा-यास चोप
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - ओळखीचा गैरफायदा घेत महिलेशी तिच्या घरातच अश्लील वर्तन करणारा किराणा दुकानदार मुकेश चंद्रभान मंधान (वय 42, गणपती नगर, जळगाव) याला विवाहितेच्या पतीने गुरुवारी चांगलेच चोपले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या विवाहितेच्या फिर्यादीवरुन मंधान विरुध्द एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पीडित महिलेची आजल सासू मुकेश मंधान याच्या तांबापुरातील किराणा दुकानावर कामाला होत्या. त्यामुळे पीडित महिलेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. 15 नोव्हेंबर रोजी तो पीडित महिलेचे घरी आला व घरी कोणी नसल्याचे पाहून विवाहितेशी अश्लिल वर्तन केले.
पतीला धमकी
मंधान याला विरोध करत असताना विवाहितेने पतीला सांगण्याची धमकी दिली असता त्याने त्यालाही बघून घेईन अशी उलट धमकी दिली. हा गोंधळ होत असताना बाहेर असलेली नणंद घरात आल्यावर त्याने पळ काढला. बदनामीपोटी विवाहितेने हा प्रकार घरात सांगितला नाही, मात्र 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याने मोबाईलवर फोन करुन त्रास देण्याचा प्रकार केला. त्यामुळे पीडित विवाहितेने हा प्रकार पतीला सांगितला.संतापलेल्या पतीने गुरुवारी त्याला चोप देतच पोलीस ठाण्यात आणले.