अत्याचारानंतर वृद्धाने केला बालिकेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 06:13 IST2018-06-29T06:13:56+5:302018-06-29T06:13:58+5:30

येथील समता नगरातील आठ वर्षीय बालिकेवर आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (६५) यानेच अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे

Child abuse took place after the atrocities | अत्याचारानंतर वृद्धाने केला बालिकेचा खून

अत्याचारानंतर वृद्धाने केला बालिकेचा खून

जळगाव : येथील समता नगरातील आठ वर्षीय बालिकेवर आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (६५) यानेच अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आदेशबाबाने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
१४ जून रोजी पहाटे या बालिकेचा मृतदेह समता नगरातील टेकडीवर गोणपाटात आढळला होता. घटनास्थळ व आदेशबाबाच्या घरात आढळलेले ब्रेडचे तुकडे, नानकटाई, आगपेटी आदींचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याशिवाय बालिका व आदेशबाबा यांचे डीएनए नमुने जुळून आले. पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी ‘खाकी’चा हिसका दाखविताच आदेशबाबाने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित बालिका ही दररोज आदेशबाबाच्या घरी व गल्लीत खेळायला जायची, १३ जून रोजी ती आदेशबाबाच्या घरी गेली होती. घरी कोणीच नसल्याची संधी साधून आदेशबाबाने बालिकेवर अत्याचार केला.

Web Title: Child abuse took place after the atrocities