नरेंद्र दाभोलरांच्या हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने जळगावच्या तरुणास घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 08:34 IST2018-09-06T21:09:08+5:302018-09-07T08:34:51+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी येथील असल्याचे संशय आहे.

नरेंद्र दाभोलरांच्या हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने जळगावच्या तरुणास घेतले ताब्यात
जळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी येथील असल्याचे संशय आहे.
विशाल सूर्यवंशीचे साकळीत गॅरेज
विशाल सूर्यवंशी हा तरुण कर्की ता. मुक्ताईनगर येथील मुळ रहिवाशी असून त्याच्या वडीलाचे निधन झाल्यानंतर तो आई व आजी सोबत साकळी येथे मामाकडे राहण्यास आला.प्लॉट भागात स्वत:चे घर आहे. त्याचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. गेल्या ८-१० वर्षापासून तो साकळी येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
अडीच तास चालली घराची झडती
एटीएसचे दोन पथके साकळीत दाखल झाले. विशाल याला ताब्यात घेतल्यानंतर एका वाहनाने त्याला तत्काळ अज्ञातस्थळी हलवले तर दुसºया वाहनातील (क्र.एम.एच.१५,एए ४११८) पथकाने विशाल याच्या घराची सुमारे अडीच तास झडती घेतली. बंद घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती पथकाने दिली नाही.