१५ वर्षांपासून घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:41 IST2017-12-15T00:41:19+5:302017-12-15T00:41:23+5:30
जालना शहरासह जिल्ह्यात आठ ठिकाणी घरफोड्या करणा-या किशोर तेजराव वायाळ यास जालना पोलिसांनी ताब्यात घेतले

१५ वर्षांपासून घरफोड्या करणारा चोरटा जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरासह जिल्ह्यात आठ ठिकाणी घरफोड्या करणा-या किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु., ता.चिखली) यास जालना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून आठ लाख चार हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंधरा वर्षांपासून केवळ दिवसा घरफोडी करणा-या वायाळने राज्यभरात व परराज्यातही धुमाकूळ घातला होता.
शहरातील दत्त मंदिर परिसरातील प्रशांतीनगरात आठवडाभरापूर्वी एका महिलेवर दिवसा हल्ला करून घरफोडी करण्याची घटना घडली होती. या प्रकरणी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधात होते. दरम्यान, या पूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगार किशोर वायाळवर गुन्हे शाखेच्या अधिका-यांना संशय होता. पोलिसांनी पाळत ठेवून किशोर वायाळ शहरात चोरी करण्याच्या उद्देशाने आला असता, त्यास ताब्यात घेतले. जालना शहरात सात व सेवलीत एक घरफोडी केल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने तसेच रोख असा एकूण आठ लाख ४९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलीस आीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, भालचंद्र गिरी, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर, विलास चेके, वसंत राठोड यांनी ही कारवाई केली.