मिरची बाजाराला वातावरणाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:21 IST2018-02-13T23:21:06+5:302018-02-13T23:21:13+5:30
वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.

मिरची बाजाराला वातावरणाचा फटका
गजानन वानखडे/जालना : वातावरणात झालेला बदल आणि गारपिटीमुळे लाल मिरची ओलसर झाल्याचे कारण पुढे करत व्यापा-यांनी मंगळवारी दहा ते बारा हजार रूपये क्विंटल विकल्या जाणा-या लाल मिरचीची साडेसात ते आठ हजार रूपयाने खरेदी केली. त्यामुळे शेतक-यांना प्रति क्विंटल दोन हजार रूपयांचा फटका बसला.
निव्वळ वातावरण खराब मिरची ओलसर असल्याचे कारण पुढे करत मिरची व्यापा-यांनी मिरचीचे पाडले. परिणामी दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल विकल्या जाणारी मिरची साडेसात ते आठ हजार रूपये प्रति क्विंटल दराने नाईलाजाने शेतक-यांना विकाली लागल्याने मिरची उत्पादक शेतक-यांना तब्बल दोन ते अडीच हजार रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. दर मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भरणा-या मिरची बाजारात जालना जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लाल मिरची विक्रीस आणतात. गत दोन वर्षापासून मिरचीवर पडलेल्या रोग आणि योग्य भाव मिळत नसल्याने मिरची उत्पादन शेतकरी हैराण झाले होते. सध्या मार्च एप्रिल २०१७ मध्ये लागवड केलेली लाल मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. दहा ते बारा हजार रूपये प्रति क्विंटल लाला मिरचीला भाव येत असल्याने मिरची बाजारात गेल्या आठवड्यात २००० हजार पोते लाल मिरचीची चागली आवक झाली होती. मिरची सर्वांधीक ११ हजार रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला होता. मात्र काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे मिरचीचा ऊन न मिळाल्याने मिरची चामट झाली आहे. मात्र मिरचीच्या दर्जा मात्र कायम आहे. असे असतांना व्यापा-यांनी चांगली मिरची कमी दराने मांगितल्याने शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
............................
काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि गारपिट आणि पावसामुळे लाल मिरची ओलसर झाली आहे. मिरचीची गुणवत्ता पाहून मिरची खरेदी करण्यात येत आहे.
- इस्माईल शेख, मिरची व्यापारी