कार दुभाजकाला धडकून चार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:17 IST2018-01-21T00:17:26+5:302018-01-21T00:17:26+5:30
भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले.

कार दुभाजकाला धडकून चार गंभीर
चंदनझिरा : भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. जालना-औरंगाबाद मार्गावरील एसटी वर्कशॉपसमोर शनिवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.
वसई येथील कार (एमएच-०२-एक्यू-५६५०) एसटी वर्कशॉपसमोरुन जालन्याकडे येत होती. समोर अचानक डुक्कर आल्याने चालकाने कारवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरधाव कार दुभाजकावर जाऊन उलटली. यात वसई परिसरात राहणारे नंदकिशोर गजभिये (६१), ज्योती मनीष गजभिये (२९), कल्पना नंदकिशोर गजभिये (२७) आणि चेतन नंदकिशोर गजभिये (२८) हे चार जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. सध्या जमखींची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघाताची चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.