बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 18:00 IST2017-12-04T17:51:15+5:302017-12-04T18:00:38+5:30
या दोन भटक्यांना कायम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचा छंद होता. मात्र तो छंद त्यांना आता महाग पडला आहे.

बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक
बँकॉक : गेल्या काही वर्षात भटकत्यांची संख्या वाढतेय. जगभर भ्रमंती करून तिकडचा अनुभव फोटो रुपात किंवा शब्दरुपात बंदिस्त करण्याचीही पद्धत वाढतेय. अशीच आवड असलेल्या दोघांना एक जरा वेगळाच छंद होता. हा विचित्र छंद त्यांच्या आता अंगलट आला आहे. थायलंडच्या बुद्ध मंदिराबाहेर नग्न फोटो काढून या व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. हे फोटो व्हायरल होऊन थायलंडच्या पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचले आणि थायलंडच्या पोलिसांनी या दोघांना बँगकॉक एअरपोर्टवरून अटक केली.
मिरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक असलेले जोसेफ (३८) आणि ट्रॅविस (३६) या दोघांना भटकंतीचा छंद होता. भ्रमंती करताना काढलेले असे अश्लिल फोटो ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असत. त्यांच्या या अकाऊंटला १४ हजारहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. या दोघांनी थायलंडच्या प्रसिद्ध वॉर अरुम मंदिराबाहेर विचित्र फोटो काढले. असे विचित्र फोटो @travelling_butts या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड होताच अनेकांनी शेअरही केले. म्हणून थायलंडच्या पोलिसांपर्यंत हे फोटो पोहोचले. पवित्र ठिकाणी असे अश्लिल फोटो काढल्यामुळे पोलीस या दोघांच्या मागावर होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचाच वापर केला. त्या अकाऊंटचा वापर करत थायलंडच्या पोलिसांनी या दोघांना बँगकॉकच्या एअरपोर्टवरून अटक केली आहे.
आणखी वाचा - हॉंगकॉंग आहे जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं ठिकाण!
थायलंडच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांना ५ वर्षांची शिक्षा आणि ९९३६ रुपये प्रत्येक फोटोमागे दंड ठोठावण्यात आला आहे. थायलंड इमिग्रेशन पोलिसाचे उपप्रवक्ते Col Choengron Rimpadee यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना दिलेली शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर थाय इमिग्रेशन पोलिसांकडून त्यांचा व्हिसा कायमचा बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना थायलंडमधून हद्दपार केलं जाईल. तसंच पुन्हा थायलंडमध्ये येण्यासही मज्जाव केला जाणार आहे. तसंच, पोर्नोग्राफी फोटो इंटरनेटवर टाकल्याप्रकरणीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.या आरोपींनी सॅन डिएगो पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र त्यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्ती केली आहे. त्यामुळे असे फोटो तुम्हीही काढत असाल तर सावधान. कारण असा हौशी फोटोग्रार्फसना चांगलीच शिक्षा होऊ शकते.
सौजन्य - www.mirror.co.uk