ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून- बराक ओबामा
By Admin | Updated: June 13, 2016 01:00 IST2016-06-13T00:21:09+5:302016-06-13T01:00:05+5:30
अमेरिकेतल्या गे नाइट क्लब ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून झाल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी केलं

ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून- बराक ओबामा
ऑनलाइन लोकमत,
अमेरिका, दि. 13- अमेरिकेतल्या गे नाइट क्लब ऑरलेंडोवर झालेला हल्ला हा दहशतवादी कृत्यातून झाल्याचं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी केलं आहे. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत ओबामांनी माहिती दिली आहे. हा हल्ला दहशतवादी कृत्यातून आणि द्वेषातून झाल्याचं मत बराक ओबामांनी मांडलं आहे.
फेडरल ब्युरो इन्वेस्टिगेशन (एफबीआय) या हल्ल्याचा योग्य तपास करत आहे. गोळीबारात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला असून, 53 हून जास्त लोक जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. हा हल्ला म्हणजे समलैंगिक मित्रांसाठी निराशाजनक दिवस असल्याचं ओबामा म्हणाले आहेत. हा जीवघेणा हल्ला ओमर मतीन या बंदुकधा-या व्यक्तीनं केल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे.
पोलीस हल्ल्याचा अधिक तपास करत असून, आम्ही ऑरलेंडोच्या लोकांसोबत असल्याचं बराक ओबामांनी सांगितलं आहे.
हल्लेखोरांकडे आत्मघाती बॉम्बही होते. एका हल्लेखोराने आत्मघाती बॉम्ब शरीरावर बांधून ठेवल्याचंही माहिती उघड झाली होती. ऑरलँडो पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलरवरही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या क्लबपासून लोकांनी दूर राहण्याचं आवाहनही पोलिसांनी केले आहे. तसेच सोशल मीडियावर नागरिकांकडूनही या हल्ल्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.