चीनमध्ये धावली विनाचालक कार
By Admin | Updated: April 12, 2016 21:24 IST2016-04-12T19:31:13+5:302016-04-12T21:24:11+5:30
चीनची ऑटोमोबाईल कंपनी 2018पर्यंत चालकविरहित कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.
चीनमध्ये धावली विनाचालक कार
ऑनलाइन लोकमत
चीन, दि. १२- चीनची ऑटोमोबाईल कंपनी 2018पर्यंत चालकविरहित कार बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. दोन चालकविरहित कारची चीनच्या ऑटोमोबाईल कंपनीनं प्रात्यक्षिकंही केली आहेत. गुगलच्या कारला टक्कर देण्यासाठी चीननं ही कार बनवली आहे.
चीनला 2020पर्यंत चालकविरहित कार रस्त्यावर धावतील, अशी आशा आहे. या कार चालकाला त्याचा मार्ग शोधण्यासाठीही मदत करणार आहेत. शहरातले रस्ते आणि महामार्गावर या गाड्या चांगल्या प्रकारे चालणार आहेत. मात्र या गाड्यांना नियोजित स्थळी जाण्यासाठी चालकाच्या मार्गदर्शनाची गरज लागणार आहे.
आम्ही या गाड्यांमधलं सेन्सर आणि प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सुधारत असल्याचं ऑटोमोबाईल कंपनीनं म्हटलं आहे. ही चालकविरहित कार 2018पर्यंत बाजारात आणण्याचं चीनचं लक्ष्य आहे. या गुगलच्या चालकविरहित कारनं आतापर्यंत 10 लाखांच्या मैलाचा टप्पा पार केला आहे.