मालदीवचे मोहंमद नशीद यांना अटक
By Admin | Updated: February 22, 2015 23:44 IST2015-02-22T23:44:59+5:302015-02-22T23:44:59+5:30
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष व विरोधी पक्षनेते मोहंमद नशीद (४७) यांना दहशतवादविरोधी कायद्याखाली रविवारी अटक करण्यात आली.

मालदीवचे मोहंमद नशीद यांना अटक
माले : मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष व विरोधी पक्षनेते मोहंमद नशीद (४७) यांना दहशतवादविरोधी कायद्याखाली रविवारी अटक करण्यात आली. २०१२ मध्ये नशीद यांनी वरिष्ठ न्यायाधीशाच्या अटकेचे आदेश दिले होते व त्यानंतर देशात हिंसाचार उसळला होता.
नशीद यांना अटक करण्यात आली, असे मालदिवियन डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष अली वहीद यांनी म्हटले. दरम्यान, नशीद पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या अटकेचे आदेश फौजदारी न्यायालयाने जारी केले. (वृत्तसंस्था)