आठ वर्षांपासून ओबामा एकाच रंगाचा कोट वापरतात
By Admin | Updated: June 9, 2017 21:20 IST2017-06-09T21:20:04+5:302017-06-09T21:20:04+5:30
नेते मंडळी म्हटलं की त्यांच्याकडे ढिगभर कपडे असणार. त्यातूनही एकदा का त्यांनी कपडे घातले की त्या कपड्यांना ते हातही लावत नसतील अशीही अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील.

आठ वर्षांपासून ओबामा एकाच रंगाचा कोट वापरतात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - नेते मंडळी म्हटलं की त्यांच्याकडे ढिगभर कपडे असणार. त्यातूनही एकदा का त्यांनी कपडे घातले की त्या कपड्यांना ते हातही लावत नसतील अशीही अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गेल्या आठ वर्षांपासून ओबामा एकच काळा रंगाचा सूट वापरत असल्याचे गुपित त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी उघड केले आहे. अनेक अमेरिकन नागरिकांसाठी आजही बराक ओबामा ह्यहिरोह्ण आहेत. त्यांच्या या साधेपणामुळे त्यांच्या चाहत्यात नक्कीच वाढ झाली असावी.
मिशेल ओबामा यांनी एका कार्यक्रमात याबद्दलचं गुपित उघडून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या गुपितामुळे ओबामा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोणताही कार्यक्रम असो बराक यांनी त्या प्रत्येक कार्यक्रमात एकच टक्सिडो घातला आहे. अनेकदा माझ्या कपड्यांची, माझ्या स्टाईलची चर्चा झाली. मी कोणत्या ब्रँडच्या चप्पला वापरते, मी कोणत्या अॅक्सेसरीज घालते याबद्दल अनेकदा फॅशन मॅगझिनमध्ये छापून येतं. कार्यक्रमाला आमचे शेकडोंनी फोटोही छापून आलेत. पण या कालावधीत ओबामा हे सगळीकडे एकच कोट घालून फिरतात हे कोणाच्याही लक्षात आलं नाहीह्ण असं त्या कॅलिफोर्नियातल्या एका परिषदेत बोलत होत्या. ऐकून सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या पण त्याचबरोबर ओबामांबद्दल मनात आदर आणखीणच वाढला.