दर्ग्याच्या माथेफिरू व्यवस्थापकाने केली 20 जणांची हत्या
By Admin | Updated: April 2, 2017 15:00 IST2017-04-02T14:31:12+5:302017-04-02T15:00:16+5:30
पाकिस्तानमधील सरगोधा शहरात काल रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने 20 जणांची हत्या केली

दर्ग्याच्या माथेफिरू व्यवस्थापकाने केली 20 जणांची हत्या
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 2 - पाकिस्तानमधील सरगोधा शहरात काल रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने 20 जणांची हत्या केली. या घटनेत दोन महिलांसह 3 अन्य जण जखमी झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
सरगोधाचे उपायुक्त लियाकत अली चट्टा यांनी सांगितले की, अहमद गुज्जर दर्ग्याचे व्यवस्थापक अब्दुल वाहीद यांनी दर्ग्यातील अनुयायांना चाकूने भोसकून आणि दांडक्यानी मारहाण करून ठार मारले. मारण्यापूर्वी या अनुयायांना बेशुद्ध करण्यात आले होते.
हे हत्याकांड घडवून आणणारा अब्दुल वाहिद हा विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती पंजाब प्रांतातील विविध भागात राहणाऱ्या आहेत. ही घटना घडल्यानंतर दर्ग्यातील एका महिलेने पळून जात हॉस्पिटल गाठले आणि तिनेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे हत्याकांड उघड झाले. दरम्यान पोलिसांनी वाहिद आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांना अटक केली आहे.