अतिथी निदेशकांना मिळेना मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:08 IST2017-12-19T00:07:58+5:302017-12-19T00:08:22+5:30

मागील सहा महिन्यांपासून अंशकालीन, अतिथी निदेशकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असून याबाबत जि. प. अध्यक्षा यांना हिंगोली जिल्हा कला क्रीडा कार्यानुभव कृती समिती तर्फे निवेदन देण्यात आले.

Guest directors get the honor | अतिथी निदेशकांना मिळेना मानधन

अतिथी निदेशकांना मिळेना मानधन

ठळक मुद्देहिंगोली : वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन दखल घेईना

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील सहा महिन्यांपासून अंशकालीन, अतिथी निदेशकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असून याबाबत जि. प. अध्यक्षा यांना हिंगोली जिल्हा कला क्रीडा कार्यानुभव कृती समिती तर्फे निवेदन देण्यात आले.
जून ते नोव्हेंबर २०१७ आतापर्यंत मानधन मिळाले नाही. वेळोवेळी पाठपुरावा करूनही मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे १८ डिसेंबर रोजी जि. प. अध्यक्षा यांना समितीच्या वतीने निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी पदाधिकाºयांनी केली. मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने कर्मचाºयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. औरंगाबाद व परभणी येथील अंशकालीन, अतिथी निदेशकांना मानधन मिळाले आहे. परंतु हिंगोली जिल्ह्यातील निदेशकांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे तत्काळ मानधन देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर ए. एस. मस्के, मारोती निरगुडे, शेकूराव वडकुते, केदारलींग आढळकर, गोविंद कदम यांच्यासह पदाधिकाºयांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Guest directors get the honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.