काळ्या बाजारात जाणारा रॉकेलसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:19 IST2018-01-12T23:19:34+5:302018-01-12T23:19:37+5:30
औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळ्या बाजारात जाणारा रॉकेलसाठा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल घेऊन जाणारा आॅटो (क्रमांक एमएच-२६-एडी-१८६५) पोलिसांनी १२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पकडला. अंदाजे ४० हजार रूपये किंमतीचे रॉकेल व २ लाख रूपयांचा आॅटो पोलिसांनी कारवाई करून जप्त केला. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या पथकातील एपीआय बी. आर. बंदखडके व त्यांच्या सहकाºयांनी ही कारवाई केली. याप्रकरणी शेख जमीर शेख मकसूद याच्याविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी येथील काळ्या बाजारात अवैध रॉकेल विक्री सर्रासपणे सुरू आहे. परंतु येथील संबधित प्रशासकीय अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.