'या' भाज्या जास्त शिजवल्याने होतात खराब, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:19 AM2024-04-17T10:19:48+5:302024-04-17T10:20:14+5:30
Vegetables Cooking Tips : बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की, काही भाज्या जास्त शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात आणि ते शरीराला मिळत नाहीत.
Vegetables Cooking Tips : भाज्या खाऊन आपल्या शरीराला पोषण मिळतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे एक्सपर्ट्सही रोज वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. पण बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की, काही भाज्या जास्त शिजवल्याने त्यातील पोषक नष्ट होतात आणि ते शरीराला मिळत नाहीत.
भाज्यांमध्ये शरीर मजबूत करणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. सोबतच डायबिटीस, हार्ट अटॅक, कॅन्सरपासून वाचवण्याची क्षमता असते. पण भाज्याचं सेवन करूनही लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहे. त्यामागचं कारण म्हणजे भाज्या चुकीच्या पद्धतीने बनवणं. चुकीच्या पद्धतीमुळे भाज्यांमधील पोषक तत्व नष्ट होतात.
भाज्यांमध्ये अनेक न्यूट्रिएंट असतात. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स किंवा इतरही पोषक तत्वे असतात. अशात भाज्या जास्त शिजवल्या तर हे पोषक तत्व नष्ट होतात. प्रत्येक भाज्यांचं एक तापमान असतं. या भाज्या त्यापेक्षा जास्त शिजवल्या तर खराब होतात.
एका शोधानुसार, जास्त तापमानावर शिजवल्याने क्रूसिफेरस व्हेजिटेबल्समधील पोषण कमी होतं. त्यामुळे या भाज्या जास्त आसेवर जास्त वेळ शिजवणं टाळलं पाहिजे.
ब्रोकली
ब्रोकली एक क्रूसिफेरस भाजी आहे. यात कॅल्शिअम, व्हिटॅमिन के, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. ही भाजी वजन कमी करण्यास आणि कॅन्सरपासून वाचवण्यासाठी महत्वाची मानली जाते.
फूलकोबी
फूलकोबी सुद्धा क्रूसिफेरस फॅमिलीतील भाजी आहे. ही भाजी गट बॅक्टेरियाचं बॅलन्स ठेवते. पोटासाठी ही भाजी खूप चांगली असते. याने इंफ्लामेशन कमी होतं आणि सेल्स डॅमेजपासूनही बचाव होतो.
कांदा
जास्त तापमानावर शिजवल्याने कांद्यातील वॉटर कंटेंट कमी होतं. कांदा उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो. पण त्याला जास्त भाजलं किंवा शिजवलं तर यातील अॅंटी-बॅक्टेरिअर तत्व कमी होतात.
लसूण
लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं. जर ते नष्ट झालं तर लसणातील अर्धी शक्ती निघून जाते. याने ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते. जास्त आसेवर त्याला भाजल्याने, तळल्याने किंवा शिजवल्याने यातील हे पोषक तत्व कमी होतं.
भाज्या बनवण्याची योग्य पद्धत
भाज्या उकडून, स्टीमिंग, ग्रिलिंग, रोस्टिंग, ब्लाचिंग, फ्राइंग करून बनवल्या जातात. यातील तुम्ही तुम्हाला हवी ती पद्धत निवडू शकता. पण काळजी घ्या की, त्यातील पोषण कमी होणार नाही.