डायबिटीसच्या रूग्णांना असतो लिव्हर कॅन्सरचा अधिक धोका, जाणून घ्या लक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:56 PM2024-04-16T12:56:01+5:302024-04-16T12:56:46+5:30

Liver Cancer : अभ्यासकांनी सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये गडबड झाल्याने लिव्हरच्या समस्या इतकंच नाही तर लिव्हर कॅन्सरचाही धोका असतो.

Diabetic patients have a higher risk of liver cancer, know the symptoms | डायबिटीसच्या रूग्णांना असतो लिव्हर कॅन्सरचा अधिक धोका, जाणून घ्या लक्षण 

डायबिटीसच्या रूग्णांना असतो लिव्हर कॅन्सरचा अधिक धोका, जाणून घ्या लक्षण 

Liver Cancer : कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. तो शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. जगभरातील लोक कॅन्सरने शिकार होतात आणि यामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्याही खूप जास्त आहे. लिव्हर कॅन्सरही जगभरात एक मोठी समस्या आहे. अभ्यासकांनी सांगितलं की, लाइफस्टाईलमध्ये गडबड झाल्याने लिव्हरच्या समस्या इतकंच नाही तर लिव्हर कॅन्सरचाही धोका असतो.

लिव्हरसंबंधी समस्यांबाबत लोकांना जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी 19 एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे पाळला जातो. एक्सपर्ट सांगतात की, लिव्हरमध्ये होणारा कॅन्सर गेल्या काही वर्षात वेगाने वाढत आहे. यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी सतत प्रयत्न केले पाहिजे.

लिव्हरमध्ये होणारा कॅन्सर

लिव्हर कॅन्सर लिव्हरच्या कोशिकांमध्ये सुरू होतो. लिव्हर कॅन्सरचा सगळ्यात कॉमन प्रकार हेपेटोसेलुलर कार्सिनोमा आहे जो मुख्य प्रकारच्या लिव्हर कोशिकांमध्ये असतो.

एक्सपर्ट सांगतात की, लिव्हर कोशिकांच्या डीएनएमध्ये बदलामुळे यात कॅन्सर होऊ शकतो. क्रोनिक हेपेटाइटिस संक्रमण किंवा लिव्हरमध्ये काही काळापासून असलेल्या काही समस्यांमुळेही कॅन्सर विकसित होऊ शकतो. कधी कधी कॅन्सर अशा लोकांनाही होतो ज्यांना लिव्हरसंबंधी काही आजार नसतो.

कशी पटवाल ओळख?

जास्तीत जास्त लोकांमध्ये प्राथमिक स्थितीत लिव्हर कॅन्सरचे कोणते संकेत किंवा लक्षण दिसत नाही. पचनासंबंधी काही समस्या नक्की होऊ शकतात. जसजशा कॅन्सरच्या पेशी वाढत जातात याची लक्षण अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ, उलटी, कमजोरी आणि थकवा राहणे, काविळ पुन्हा पुन्हा होणे ही लिव्हर कॅन्सरची सुरूवातीची लक्षण आहेत.

कुणाला असतो जास्त धोका

एक्सपर्ट सांगतात की, ज्या लोकांना हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी वायरसचं इन्फेक्शन झालं असेल त्यांना लिव्हर कॅन्सरचा धोका अधिक राहतो. सिरोसिससारख्या आजारामुळेही याचा धोका वाढतो. तसेच पुन्हा पुन्हा फॅटी लिव्हरची समस्या होत राहणे, दारूचं अधिक सेवन यामुळेही तुम्हाला लिव्हर कॅन्सर होऊ शकतो.

एक्सपर्ट सांगतात की, ज्या लोकांना डायबिटीस आहे त्यांनी आणखी जास्त काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांमध्ये लिव्हर कॅन्सरचा धोका वेळेनुसार वाढत जातो.

डायबिटीस रूग्णांना कॅन्सर

शोधातून समोर आलं आहे की, टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीस असलेल्या रूग्णांमध्ये लिव्हर कॅन्सर विकसित होण्याचा धोका अधिक राहतो. अशा लोकांना डायबिटीस नसणाऱ्या लोकांच्या तुलनेत दोन ते तीन पटीने कॅन्सरचा धोका बघण्यात आला आहे. 

Web Title: Diabetic patients have a higher risk of liver cancer, know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.