मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर कदंब कर्मचाऱ्यांचे आंदाेलन स्थगीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:35 PM2024-03-09T13:35:09+5:302024-03-09T13:35:21+5:30
सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे.
नाराराण गावस
पणजी: आपल्या विविध मागण्यांसाठी गेला एक महिना आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कदंब कर्मचारी संघटनेच्या कामगारांनी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर आपले आंदाेलन स्थगीत केले. साेमवारी कामगारांच्या मागण्यावर करार केला जाणार आहे. सोमवारी करारावर सह्या न झाल्यास पुन्हा आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशाराही कामगारांनी सरकारला िदिला आहे.
कामगार नेते ॲड. सुहास नाईक म्हणाले, संघटना पदाधिकाऱ्यांच्या शिष्ट मंडळाला बोलावून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागण्याविषयी तसेच सोमवारी सातव्या वेतन आयोगासंदर्भात करार करण्याचे आश्वासन दिले. तसेच थकबाकीसाठी किती निधी लागेल, तो कसा दिला जाईल याची माहिती देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाच्या सचिवाला केली. तसेच जे राेजंदारीवर कामगार हाेते त्यांच्या पगारात १८ हजारावरुन २० हजार केली तसेच जे ३ वर्षापासून जास्त कंत्राटी तत्वावर आहेत. त्यांना सेवेत घेण्यासाठी नियाेजन केले जाणार असल्याचे सांगितले
ॲड राजू नाईक म्हणाले, कंदब महामंडळाचे संवर्धन तसेच महामंडळात नवीन बसेस घेऊन ते सुरु करावे. कामगारांची २००९ पासून भविष्य निर्वाह निधीचा असलेला प्रश्न सोडवावा. निवृत्त झालेत त्यांना कमी पेन्शन मिळते ते वाढवावे. ३४ महिन्यांची थकबाकी असे विविध मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी फक़्त आश्वासन नाही तर लेखी करार केली जाणार असल्याने हे आंदोलन स्थगीत करत आहाेत. आम्हाला सर्व प्रसारमध्यामांनी साथ दिल्याने कामगारांचा आवाज सरकारपर्यंत पाेहचला व मागण्या मान्य झाल्या असे यावेळी ॲड. नाईक म्हणाले.