जैवविविधता समित्या बळकट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:26 IST2017-10-23T23:26:15+5:302017-10-23T23:26:29+5:30
पर्यावरणाचा समातोल राखण्यात जैवविविधतेचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्तरावरील जैवविविधता समित्या बळकट कराव्या,

जैवविविधता समित्या बळकट करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : पर्यावरणाचा समातोल राखण्यात जैवविविधतेचे अत्यंत मोलाचे स्थान आहे. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्तरावरील जैवविविधता समित्या बळकट कराव्या, असे प्रतिपादन जैवविविधता बोर्ड नागपूरचे सचिव डॉ. विनय सिन्हा यांनी केले.
दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौºयादरम्यान रविवारी त्यांनी सिरोंचा तालुक्यातील वडधम, आसरअल्ली, अंकिसा, अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पला भेट दिली. हत्तींच्या आरोग्यविषयी तसेच पालनपोषणाविषयी कर्मचाºयांकडून माहिती जाणून घेतली. वडधम येथे फॉसिल पार्क आहे. या पार्कलाही त्यांनी भेट दिली. फॉसिल पार्कविषयी त्यांनी स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा केली. आलापल्ली येथील ग्लोरी आॅफ फॉरेस्टला भेट देऊन माहिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक जैवविविधता आहे. ही जैवविविधता सांभाळल्यास स्थानिक नागरिकांना निश्चितच उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल. जैवविविधता कायम ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समितीच्या सदस्यांना जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीशिवाय जैवविविधता टिकवून ठेवणे कठीण असल्याने वन विभागानेही स्थानिक नागरिकांना आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे, अशा सूचना डॉ. विनय सिन्हा यांनी केल्या. दौºयादरम्यान मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.वाय. एटबॉन, उपवनसंरक्षक एन.सी. बाला, तुषार चव्हाण यांच्यासह वनाधिकारी उपस्थित होते.