शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:31 IST2017-08-16T23:30:31+5:302017-08-16T23:31:06+5:30
भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ....

शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना शौय पदक मिळाले त्याबद्दल राज्याचे आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा गडचिरोेली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नक्षल चकमकीत शहीद झालेले पोेलीस जवान दोगे डोेलू आत्राम यांच्या पत्नी दोगे व शहीद पोलीस शिपाई स्वरूप कुमार अशोक अमृतकर यांच्या आई कल्पना अमृतकर यांचा पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस निरीक्षक प्रफुल प्रभाकर कदम, सहायक पोलीस निरीक्षक विजय रमेशराव रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे, सहायक फौजदार मोतिराम बक्का मडावी यांना पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नक्षल व पोलीस यांच्या जंगलामध्ये झालेल्या चकमकीत उत्कृष्ट कामगिरी बजाविलेल्या पोलीस जवानांना शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भीमराव काळे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन माने, पोलीस हवालदार मल्लेश केडकमवार, पोलीस नाईक जितेंद्र मारगाये, पोेलीस शिपाई गजेंद्र सौैंजाल यांचा समावेश आहे.
गुणवंत विद्यार्थिनींचाही झाला गौरव
सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील स्काऊट-गाईड अंतर्गत ५ कब व १० बुलबुल यांना चतुर्थ चरण व हिरकपंख राज्यस्तरीय पुरस्काराने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये जि. प. हायस्कूलचा सिरोंचाचा विद्यार्थी बेनू मलय्या बुराम, आफताफ हकीम शेख, अअदनान एस. अमित शेख, मोहम्मदकाई डी.ए. कलाम शेख, समिरसाहेब हुसेन शेख व महात्मा गांधी नगर परिषद शाळा गडचिरोेलीची विद्यार्थिनी निर्जरा सुरेंद्र बन्सोड, स्नेहा शेषराव रंधये, प्रांजली किरण नैताम, रश्मी संजय मेश्राम, कीर्ति सुभाष जिगरबान, सानिया आनंद शेंडे, अंजली रेवाचंद बन्सोेड, जेवा आदिल शेख, स्वाती राजेश्वर मेश्राम, रहेमन आरिफ फेनोगे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.