बिजेपार येथे वीज पडून तीन बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:16 IST2017-10-09T23:16:34+5:302017-10-09T23:16:47+5:30
पावसादरम्यान वीज पडून तीन बैल ठार झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १५ अंतरावर असलेल्या बिजेपार येथील शेतशिवारात ७ आॅक्टोबर रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास घडली.

बिजेपार येथे वीज पडून तीन बैल ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : पावसादरम्यान वीज पडून तीन बैल ठार झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १५ अंतरावर असलेल्या बिजेपार येथील शेतशिवारात ७ आॅक्टोबर रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास घडली.
ठार झालेले तिनही बैल बिजेपार येथील शेतकरी सुंदरलाल जेटू कुमरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य क्रांती केरामी, बाबुराव मडावी, निरंजन मडावी, मोहन कुरचाम, पुरूषोत्तम हलामी, उत्तम आतला यांनी घटनास्थळी भेट दिली. शेतकरी सुंदरलाल कुमरे यांनी गतवर्षी बैलजोडी खरेदी केली होती. वीज कोसळून तीन बैल ठार झाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. तीन बैल दगावल्याने दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती सुंदरलाल कुमरे यांनी दिली.
शेतशिवारात तिन्ही बैल बांधलेले असताना पावसादरम्यान वीज कोेसळल्याने तीन बैल ठार झाले. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कुमरे यांनी केली आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आपण शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन जि. प. सदस्य क्रांती केरामी यांनी कुमरे यांना दिले.