अरततोंडीत महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:43 IST2018-03-08T22:43:59+5:302018-03-08T22:43:59+5:30
तालुक्यातील अरततोंडी येथील एका महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

अरततोंडीत महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला
आॅनलाईन लोकमत
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी येथील एका महिलेच्या डोक्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
कल्पना रघुनाथ तिभागे रा. अरततोंडी असे जखमी महिलेचे नाव आहे. हल्ला करणारा अल्पवयीन मुलगा आहे. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कल्पना तिभागे हिचे शेजारी राहणाऱ्या गावातील एका महिलेसोबत शेळीवरून भांडण झाले. दरम्यान अल्पयीन मुलाने तिभागे यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये तिभागे गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबतची तक्रार कुरखेडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. जखमी महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. दुर्वा यांनी दिली.
पं.स. उपसभापती मनोज दुनेदार, पं.स. सदस्य शारदा पोरेटी, माधुरी मडावी, सुनंदा हलामी, कविता गुरनुले यांनी जखमी महिलेची भेट घेतली.