Video : सिगारेट आणून न दिल्याने मद्यधुंद मॉडेलने कपडे काढून घातला धिंगाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:23 IST2018-10-29T20:15:38+5:302018-10-31T18:23:43+5:30
पोलीस तिला पोलीस ठाण्यात नेत असताना तिने परिधान केलेले अंगावरील कपडे काढले. हतबल झालेले पोलीस निघून गेले आणि नंतर सध्या वॉचमन आणि सचिवाचा जबाब नोंदवला. मात्र कोणताही गुन्हा अदयाप दाखल केलेला नाही.

Video : सिगारेट आणून न दिल्याने मद्यधुंद मॉडेलने कपडे काढून घातला धिंगाणा
मुंबई - ओशिवरा परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत एका मॉडेलने दारू पिऊन चांगलाच धिंगाणा घातला. एवढ्यावरच न थांबता मद्यधुंद अवस्थेत तिने स्वतःचे कपडेही काढले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. या मॉडेलने बिल्डिंगच्या वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितले. त्याने नकार दिल्याने तिने हा धंगाणा घातला.
ओशिवराच्या एका उच्चभ्रू इमारतीत भाड्याने राहणाऱ्या मॉडेलने 25 ऑक्टोबरला मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत खाली आली आणि वॉचमनला सिगारेट आणण्यास सांगितलं. वॉचमनने नकार दिल्याने या मॉडेलने वॉचमनला शिव्या घालून मारहाण करण्यास सुरूवात केली. वॉचमनने शेवटी सोसायटीच्या सचिवाला बोलावलं. सचिवाने 100 क्रमांकावर फोन करून पोलीस नियंत्रण कक्षास कळविले. मॉडेलनेही 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्या मॉडेलने तर अधिकच धिंगाणा घालत लिफ्टमध्ये कपडे काढण्यास सुरूवात केली. पोलीस तिला पोलीस ठाण्यात नेत असताना तिने परिधान केलेले अंगावरील कपडे काढले. हतबल झालेले पोलीस निघून गेले आणि नंतर सध्या वॉचमन आणि सचिवाचा जबाब नोंदवला. मात्र कोणताही गुन्हा अदयाप दाखल केलेला नाही.