दुसरबीड येथे मूर्तिकाराची आत्महत्या
By Admin | Updated: September 7, 2014 00:20 IST2014-09-07T00:20:31+5:302014-09-07T00:20:31+5:30
४१ वर्षीय मुर्तीकाराने स्वत: च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसरबीड येथे मूर्तिकाराची आत्महत्या
दुसरबीड : येथील एका ४१ वर्षीय मुर्तीकाराने स्वत: च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ सप्टेंबरला घडली.
शिवप्रसाद शिंदे (४१) यांचा पेंटींग व मुर्तीकलेचा व्यवसाय होता. पंचक्रोशीत मुर्तीकार म्हणुन त्यांचा नावलौकीक होता. काल रात्रीदरम्यान मुर्तीकार शिवप्रसाद शिंदे यांनी आत्महत्या केली. सध्या संगणकीय डिजीटल बोर्ड, फ्लॅक्स बोर्डच्या वाढत्या क्रेझमुळे परंपरागत पेंटींग व्यवसाय मोडकळीस आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय डबघाईस आला, अशा परिस्थितीत लोकांची ऊसनवारी देऊ शकत नसल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मृ तक शिवप्रसाद शिंदे यांच्या खिशात आढळुन आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी अनिल शिंदे यांनी किनगांवराजा पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे