चांदमारीतील दोन कुटुंबामध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:00 IST2017-09-11T23:59:33+5:302017-09-12T00:00:15+5:30

घरातील सांडपाणी नालीत टाकण्याच्या  कारणावरून शेजार्‍यांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना स् थानिक चांदमारी भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी  तक्रारींवरून शहर पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल  केला आहे. 

A clash between two families in the quarrels | चांदमारीतील दोन कुटुंबामध्ये हाणामारी

चांदमारीतील दोन कुटुंबामध्ये हाणामारी

ठळक मुद्दे१५ जणांवर गुन्हासांडपाणी टाकण्याच्या कारणावरून वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : घरातील सांडपाणी नालीत टाकण्याच्या  कारणावरून शेजार्‍यांमध्ये वाद होवून हाणामारीची घटना स् थानिक चांदमारी भागात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी  तक्रारींवरून शहर पोलिसांनी १५ जणांविरूध्द गुन्हा दाखल  केला आहे. 
सौ.ज्योती शशिकांत बनसोडे (वय २९) यांनी शहर पोलीस  स्टेशनला तक्रार दिली की, आज सकाळी घरासमोर  मजुरांकडून नळासाठी खड्डा बनवित होते. यावेळी शेजारी  मधुकर माने, विमल माने, कलावती माने, सुधाकर माने,  ललिता माने, उत्तम माने, रेखा माने, अजय माने व नंदाबाई  बनसोडे यांनी मोबाईलमध्ये फोटो काढला. यावेळी त्यांना  आईने हटकले असता उपरोक्त सर्वांनी वाद घालुन  गैरकायद्याची मंडळी जमा केली व वाद घालून मोगरीने डो क्यात मारून जखमी केले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी  उपरोक्त नऊ जणांविरूध्द कलम १४३, १४७, १४८, १४९,  ३२३, ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला  आहे. तर सौ.विमल मधुकर माने (वय ३५) यांनी तक्रार  दिली की, घरातील चेंबरमधील सांडपाणी नालीमध्ये टाकत  असताना शेजारील शिलाबाई बनकर, जान्हवी बनकर, ज्यो ती बनसोडे, जयश्री बनसोडे, रवि बनकर, सतिष बनकर  यांनी सांडपाणी नालीत टाकू नका असे म्हणून वाद घातला व  शिवीगाळ करून गैरकायद्याची मंडळी जमवून नणंद नंदाबाई  बनसोडे यांना मारहाण करून जखमी केले. अशा  आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त सहा  जणांविरूध्द भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आले. 

Web Title: A clash between two families in the quarrels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.