बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:31 IST2018-06-08T14:31:14+5:302018-06-08T14:31:14+5:30
खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल
खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मध्यरात्रीपासून बससेवा बंद झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्यांची पंचाईत झाली. विद्यार्थी वेळेत शाळेत जाऊ शकले नाही. खामगाव, मलकापूर, जळगाव, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, चिखली या आगारातील सुमारे 850 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे चाकरमानी ग्रामिण भागातून खरेदी साठि येत आहे अश्या प्रवाशांचे हाल झाले. डेपोत बस उभ्या करत कर्मचारी पूर्णपणे संपात सहभागी झाले आहेत. बहुतांश कर्मचाºयांनी या संपात सहभाग घेतला आहे. एसटी वाहतूक ठप्प झाल्याने एसटीचं उत्पन्न बुडणार आहे. अचानक होणाºया या संपाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ऐन गर्दीत राज्यभर एस टी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.