रामपूर-आंबगड पुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:02 IST2017-10-28T00:02:24+5:302017-10-28T00:02:35+5:30
रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे.

रामपूर-आंबगड पुलाला भगदाड
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे. सुमारे सहा महिन्यापूर्वी हा पूल तयार केला होता. पूलाची स्थिती पाहून नियमानुसार व गुणवत्तापूर्वक कामे झाली असतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात रामपूर ते आंबागड गावाला जोडणारा एका रस्त्यावर लहान पूल तयार करण्यात आला. या पूलाला सध्या मोठे भगदाड पडले आहे. भगदाड मोठा असून पांढरे सिमेंट तिथे दिसते. रहदारीचा हा मार्ग असून सदर रस्ता मृत्यूमार्ग ठरला आहे. सुमारे दोन ते अडीच फुटाचा हा खड्डा आहे. सहा महिन्यापूर्वी हे काम करण्यात आले होते अशी माहिती आहे. सिमेंट काँकीटच्या हा पूल असून सहा महिन्यात पूलाला भगदाड कसे पडले हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित कंत्रादाराने दर्जात्मक व गुणवत्तापूर्वक कामे केली नाही त्याचा हा उत्तम नमूनाच म्हणावा लागेल. संबंधित विभागाच्या अभियंत्याने काय पाहणी व निरीक्षण केले असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. न पाहताच सर्व कामे सोयस्कार येथे पार कशी पडली. कर्तव्य न बजावणाºया संबंधित अभियंता व कंत्राटदारावर नियमानुसार कारवाईची गरज आहे. येथून मार्गकमण करणाºयांचा जीव धोक्यात असूनही अद्याप कारवाई झाली नाही, हे विशेष.