कृषी पंप जोडणीसाठी ४५ कोटींचा निधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:43 IST2018-03-10T22:43:58+5:302018-03-10T22:43:58+5:30
जिल्ह्यात विकासाच्या जास्तीत जास्त योजना आणण्याचा आपला मानस आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेच्या नियोजनासाठी १७ मार्चला बैठक घेण्यात येईल.

कृषी पंप जोडणीसाठी ४५ कोटींचा निधी देऊ
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्ह्यात विकासाच्या जास्तीत जास्त योजना आणण्याचा आपला मानस आहे. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेच्या नियोजनासाठी १७ मार्चला बैठक घेण्यात येईल. ६४ योजनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यात शेती व शेतकऱ्यांना प्राधान्य असेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंप जोडण्यासाठी ४५ कोटीचा निधी देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा मैदान येथे आयोजित वैनगंगा कृषी महोत्सवात ते बोलत होते. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे होते. यावेळी आ.चरण वाघमारे, आ.रामचंद्र अवसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, विभागीय कृषी सहसंचालक एन.टी. सिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर, तारिक कुरेशी, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे म्हणाले, बावनकुळे हे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्यत विकासात्मक धावपळ सुरू झाली, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणे आवश्यक आहे. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही
आ.चरण वाघमारे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतिशील शेती करण्यासाठी हा कृषी महोत्सव आहे. राज्य सरकारने प्रथमच धानाला बोनस दिला. पुढच्यावर्षी धानाला २,४०० ते २,५०० रूपये भाव मिळेल. कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असून मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर या प्रभावी योजना राज्य शासनाने राबविण्यात आल्याचे सांगितले. प्रदर्शनीचे उदघाटन करून पालकमंत्र्यांनी विविध स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिथींच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित व कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शेतीनिष्ठ शेतकरी दिवाकर पवार रा.जांब, प्रकाश दुर्गे रा.बघेडा, सोनप्रकाश मानकर रा.जांब, पुंडलिक घ्यार रा.कुशारी, प्रकाश मस्के रा.डव्वा, भास्कर भुजाडे रा.गर्रा, यादवराव मेंढे रा.भेंडाळा, नरेंद्र भुसारी रा.जांब, यादव मेश्राम रा.लवारी, देवानंद चौधरी रा.आमगाव यांना तर उद्यान पंडित पुरस्कार चिंतामन मेहर रा.पलाडी, यादोवराव कापगते रा.रेंगेपार, कृषी भूषण पुरस्कार नारायण भोगे रा.निलज, रामचंद्र कापगते रा.खंडाळा, प्राणहंस मेहर रा.कुशारी, रामभाऊ कडव रा.इंदुरखा, शेषराव निखाडे रा.सेलोटी यांचा समावेश आहे. यावेळी गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना विमोचन व विविध पुस्तिका, मधुमक्षिका पालन व मधनिर्मिती व्यवसाय फलकाचे विमोचन करण्यात आले. आरसेटीमार्फत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण घेणाºया महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले. संचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर यांनी केले.