विकास कामांचा जाब विचारत भाजप आमदार आर.टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:15 IST2018-08-22T16:10:00+5:302018-08-22T16:15:58+5:30

मागील चार वर्षात आमच्या गावात विकास कामे का केली नाहीत, असा जाब विचारात आमदार आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली.

BJP MLA R T Deshmukh threatens by NCP activist for development work | विकास कामांचा जाब विचारत भाजप आमदार आर.टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

विकास कामांचा जाब विचारत भाजप आमदार आर.टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

माजलगाव (बीड ) : मागील चार वर्षात आमच्या गावात विकास कामे का केली नाहीत, असा जाब विचारात आमदार आर. टी. देशमुख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुकी केली. ही घटना आज दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. 

आमदार आर. टी. देशमुख आज दुपारी राजेवाडी येथे अन्नाभाऊ साठे जयंती उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर गाडीत बसताना आमदार देशमुख यांना गावातील काही लोकांनी धक्काबुकी केली. आमच्या गावात चार वर्षात एकही विकास काम का केले नाही असा जाब विचारत राष्ट्रवादीच्या उपसरपंच यांचे पती रामेश्वर थेटे, दीपक महागोविंद , भाऊसाहेब पवार, माऊली महागोविंद , ईश्वर थेटे, सुखदेव कुरे यांच्यासह २५ -३० कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांना घेराव घातला आणि धक्काबुक्की केली.  

तसेच देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पवार व चालक यांना देखील यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच साठे जयंती उत्सवाचे आयोजक तात्काळ धावून आले व त्यांनी आमदारांना भोवती सुरक्षा कडे केले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. आमदार देशमुख हे पोलिसांच्या गाडीतच तेथून बाहेर पडले. महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळचे म्हणून आमदार आर. टी. देशमुख यांची बीड जिल्ह्यात ओळख आहे.

Web Title: BJP MLA R T Deshmukh threatens by NCP activist for development work