बीडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यासह चौघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:36 IST2018-01-05T00:34:48+5:302018-01-05T00:36:14+5:30
बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.

बीडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यासह चौघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांचा व्यवस्थापक यांचा मृतांत समावेश आहे. कार झाडावर आदळून हा अपघात झाला. अन्य एका घटनेत कोल्ह्यास धडक दिल्याने झालेल्या अपघातात आष्टी तालुक्यातील एक तरु ण ठार झाला. तसेच माजलगाव शहराजवळ जीपने दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, तर एक जखमी झाला. या घटना बुधवारी रात्री आठ ते बारा वाजण्याच्या दरम्यान घडल्या.
मूळचे रायमोह येथील रहिवासी व पाटोदा येथे स्थायिक असलेले माजी जि. प. सदस्य नारायणराव क्षीरसागर हे बीडहून त्यांच्या हॉटेलचा व्यवस्थापक कैलास जाधव याच्यासह पाटोद्याला येत होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बीड-नगर रस्त्यावरील जवळाला पाटीजवळ त्यांची कार वडाच्या झाडावर आदळून अपघात झाला. या अपघातात कैलास जाधव जागीच ठार झाले तर नारायणराव क्षीरसागर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून बीडला पाठवण्यात आले; मात्र रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
हापशावाले नारायणसेठ
कार अपघातात ठार झालेले नारायणराव क्षीरसागर यांनी पाटोदा व रायमोहा येथून दोन वेळा जि. प. सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या काळात पाणीटंचाई निवारण कामावर त्यांचा विशेष भर होता. तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांनी हातपंपाचे जाळे निर्माण केले. आज तालुक्याची तहान याच पाण्यावर भागवली जाते . त्यांना हापशावाले नारायणसेठ म्हणून सर्वत्र ओळखले जात असे.
आष्टीचा तरु ण ठार
बुधवारी रात्री आष्टी येथील सतीश मच्छिंद्र टेकाडे हा तरुण दुचाकीवरून पाटोद्याकडे येत असताना चुंबळी फाट्याजवळ त्याच्या गाडीस कोल्हा आडवा आला. कोल्ह्यास धडक दिल्याने सतीश तोल जाऊन पडला व त्याच्या डोक्यास मार लागला. पाटोदा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून नगरकडे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. आष्टी येथील डॉ.राहुल टेकाडे यांचा सतीश हा चुलतभाऊ आहे.
जीपची दुचाकीस धडक
माजलगावहून गोविंद वैजीनाथ कदम व युवराज बंडू राऊत (२२) (रा. पाटील गल्ली, माजलगाव) हे दोघे गेवराईकडे दुचाकीवरुन (एम.एच.१६ ए.सी.७९५) जात होते. राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील केसापुरी कॅम्प येथे जीपने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. यात युवराज राऊत हा जागीच ठार तर गोविंद कदम हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजता घडली. दरम्यान, चालक जीपसह फरार आहे. माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल आहे.