Indian Army: टाटाने लष्कराला नेक्सॉनपेक्षाही सेफ कार दिली! बुलेटप्रुफ, बॉम्ब फोडा नाहीतर भूसुरुंगाने उडवा, फरक पडत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 02:58 PM2022-07-26T14:58:34+5:302022-07-26T14:58:57+5:30
ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत.
भारतीय सैन्य आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही सेफ कारमधून कारवाया करणार आहे. पुलवामा सारख्या हल्ल्यात भारताचे जवान शहीद होतात. अशा घटनांना यापुढे चाप बसणार आहे. कारण स्वदेशी बनावटीच्या चिलखती गाड्या आता सैन्याच्या दिमतीला असणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे ज्या कंपनीने भारताला पहिली आणि सर्वाधिक सुरक्षित कार दिली त्या टाटा कंपनीने ही वाहने बनविली आहेत. या गाडीचे नाव क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम (Quick Reaction Fighting Vehicle Medium - QRFV) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात.
या चिलखती वाहनाला असॉल्ट रायफलच्या गोळ्याच काय बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत, एवढ्या मजबूत बनविण्यात आल्या आहेत. हे चिलखती वाहन टाटा एडव्हान्स सिस्टम लिमिटेड (TASL) ने बनविले आहे. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.
#TASL has successfully delivered the #QRFV to the Indian Army. The induction of this vehicle developed by TASL would greatly enhance the operational capabilities of the #IndianArmy in future conflicts. pic.twitter.com/SH26PlQmx1
— IDU (@defencealerts) July 25, 2022
काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. स्वदेशी आर्मर्ड कॉम्बॅट ही दोन वाहने सुदानला पाठविण्यात आली होती. दक्षिण सुदानला पाठवलेल्या आर्मर्ड कॉम्बॅट व्हेइकल्समध्ये QRFV M4 आर्मर्ड पर्सनल कॅरियर्स आणि TATA Xenon लाइट व्हेइकल्स होते. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत.