Maruti SUV : येताच हिट झाली मारुतीची 'ही' एसयूव्ही! वेटिंग एवढी, की आज बुक केली, तरी पुढच्या वर्षी मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:37 AM2022-09-19T11:37:16+5:302022-09-19T11:37:45+5:30
महत्वाचे म्हणजे मिड-साईज एसयूव्ही स्पेसच्या बाबतीत नवी मारुती ग्रँड विटाराचा सामना थेट ह्यूंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरसोबत असेल.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या मध्यम आकाराच्या मारुती सुझुकी ग्रँड विटारा एसयूव्हीला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ही कार लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, एसयूव्ही लॉन्च होण्यापूर्वीच, कंपनीला 55,000 पेक्षाही अधिकचे बुकिंग मिळाले आहे. यामुळे हिचा डिलिव्हरीचा कालावधी 5.5 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. अर्थात, जर एखाद्याने नवी मारुती सुझुकी ग्रँड विटारा आज बुक केली तर ती त्याला पुढच्या वर्षीच मिळेल. महत्वाचे म्हणजे मिड-साईज एसयूव्ही स्पेसच्या बाबतीत नवी मारुती ग्रँड विटाराचा सामना थेट ह्यूंदाई क्रेटा, किआ सेल्टोस आणि नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरसोबत असेल.
मारुती सुझुकी ग्रँड विटारा ही 6 ट्रिम्स- सिग्मा, डेल्टा, जेटा, अल्फा, जेटा + आणि अल्फा + मध्ये लॉन्च होईल, असे कंपनीने आधीच म्हटले आहे. यातील Zeta+ आणि Alpha+ शिवाय, सर्वच ट्रिम्स 1.5L पेट्रोल माइल्ड हायब्रिड पॉवरट्रेन (103bhp) मध्ये मिळतील. यांत 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शनही असेल. डेल्टा ट्रिमवर 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध असेल. तर, मारुती सुझुकी ऑलग्रिप सिलेक्ट एडब्ल्यूडी सिस्टिम केवळ जेटा आणि अल्फा ट्रिम्सवर मॅन्युअल गियरबॉक्ससह मिळेल. Zeta+ आणि Alpha+ व्हेरिअंटमध्ये 1.5L स्ट्रॉन्ग हायब्रिड पॉवरट्रेन (114bhp) मिळेल, यांत ई-सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
Zeta+ आणि Alpha+ ट्रिम्स मध्ये काही विशेष फीचर्स आहेत. जसे की, लेदर स्टिअरिंग व्हील, ब्लॅक लेदर सीट्स, व्हेंटिलेटेड फ्रन्ट सीट्स, 360 डिग्री कॅमेरा, अपग्रेडेड साउंड सिस्टिम, पॅडल लॅम्प्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 7.0-इंच फुल्ली-डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर, डॅशबोर्ड अँबियंट लाइटिंग, पॅनोरमिक सनरूफ, डार्क ग्रे फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स, सिल्वर रूफ रेल्स, टायर प्रेशर मॉनिटर आणि डुअल-टोन कलर स्कीम.
स्टॅन्डर्ड फिटमेन्टच्या यादीत इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल, इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये 4.2 इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ऑटो एअर कंडीशनिंग, रिअर एसी व्हेंट, किलेस एंट्री अँड गो, रिअर सेंटर आर्मरेस्ट, रिअर पार्किंग सेंसर, डुअल एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, हिल होल्डसह ईएसपी, आयसोफिक्स माउंट आणि सर्वच सीट्ससाठी 3-पॉइंट सीटबेल्टचा समावेश आहे.