सिट्रॉएनने सात सीटर कार लाँच केली! C3 एयरक्रॉस एसयूव्हीची किंमत जाहीर झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 02:13 PM2023-10-05T14:13:55+5:302023-10-05T14:14:19+5:30
सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस ही पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारात येणार आहे.
भारतीय बाजारात सिट्रॉएनने चौथा पायही रोवायचा प्रयत्न केला आहे. सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस एसयूव्ही लाँच केली आहे. ही कंपनीची भारतीय बाजारातील चौथी कार आहे. सिट्रॉएनने C3 एयरक्रॉस ही पाच आणि सात सीटर अशा दोन प्रकारात येणार आहे.
सिट्रॉएनने C3 एयरक्रॉसच्या किंमतीचा खुलासा कंपनीने केला आहे. ही कार 9.99 लाख (एक्स-शोरूम) एवढ्या किंमतीला मिळणार आहे. या कारचा मुकाबला रेनॉच्या ट्रायबर, मारुती अर्टिगा आदी सात सीटर कारशी होणार आहे. तर पाच सीटरमध्ये टाटा नेक्सॉन, ह्युंदाई क्रेटा आदी कारला टक्कर देण्यासाठी हा पर्याय कंपनीने आणला आहे.
सिट्रॉएन C3 एयरक्रॉस तीन व्हेरिअंटमध्ये येणार आहे. यू, प्लस आणि मॅक्स असे हे पर्याय असणार आहेत. तसेच १० रंगांत ही कार असणार आहे. कारची डिलिव्हरी १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पाच सीटरच्या तिन्ही व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 9,99,000, 11,34,000, 11,99,000 लाख रुपये आहे. तर 5+2 seater ची किंमत प्लस आणि मॅक्समध्ये 11,69,000, 12,34,000 लाख रुपये आहे.
अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक ORVM, वॉशरसह मागील वायपर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, रूफ-माउंटेड रिअर एसी व्हेंटसह 10-इंच इंफोटेनमेंट सिस्टिम आदी देण्यात आली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे 109bhp आणि 190Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.