उजनी जलवाहिनीची गळती अखेर रोखली
By Admin | Updated: May 31, 2016 23:28 IST2016-05-31T23:23:13+5:302016-05-31T23:28:08+5:30
उस्मानाबाद : उजनी धरणावरील पंपहाऊसनजीक जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मंगळवारी पालिका

उजनी जलवाहिनीची गळती अखेर रोखली
उस्मानाबाद : उजनी धरणावरील पंपहाऊसनजीक जलवाहिनीला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथील गळती रोखण्यात आली आहे. त्यामुळे आता पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
उजनी जलवाहिनीला धरणावरील पंपहाऊस आणि शेंद्री गावानजीक मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. लहान लिकेजही अनेक ठिकाणी होते. मध्यंतरी दोन-तीन दिवस मोहीम राबवून पालिकेच्या पथकामार्फत शेंद्रीसह अन्य ठिकाणचे लिकेज काढण्यात आले होते. त्यानंतर पंप सुरू केले होते. परंतु, उजनी धरणावरील पंपहाऊसनजीकची गळती सुरूच होती. मंगळवारी येथील गळती रोखण्यात पालिकेच्या पथकाला यश आले. लागलीच जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होईल !