राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज, यथार्थ यांना सुवर्ण, स्पर्श जाधवला रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:22 IST2018-07-21T00:21:28+5:302018-07-21T00:22:27+5:30
नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज, यथार्थ यांना सुवर्ण, स्पर्श जाधवला रौप्य
औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.
औरंगाबादचा उदयोन्मुख प्रतिभवान खेळाडू असणाऱ्या स्वराज डोंगरेने फॉईलमध्ये, तर यथार्थ थोरात याने सेबर प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. स्पर्श जाधवने सेबर, कनक पाटीलने फॉईल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जानव्ही नवपुते यांनी आपापल्या गटात कास्यपदके जिंकली. विशेष म्हणजे स्वराज डोंगरे याने सर्वसाधारण विजेतेपदासाठीच्या निर्णायक लढतीत उत्तर प्रदेशच्या खेळाडूचा ५-0 असा धुव्वा उडवत महाराष्ट्राच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीबद्दल राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.