बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:36 IST2017-12-13T00:36:20+5:302017-12-13T00:36:42+5:30
शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक शाखेच्या नाकीनऊ आणणाºया वाहनांसाठी दूध डेअरी चौकात मंगळवारपासून वेगळा प्रयोग केला आहे. चौकात अधिक काळ थांबण्यापेक्षा एकाच वेळी दोन सिग्नल सुरू केल्याने चौकातील गर्दी विरळ झाली आहे. सोमवारी वाहतुकीचा नवा प्रयोग करताना वाहतूक कोंडी झाली.

बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक शाखेच्या नाकीनऊ आणणाºया वाहनांसाठी दूध डेअरी चौकात मंगळवारपासून वेगळा प्रयोग केला आहे. चौकात अधिक काळ थांबण्यापेक्षा एकाच वेळी दोन सिग्नल सुरू केल्याने चौकातील गर्दी विरळ झाली आहे.
सोमवारी वाहतुकीचा नवा प्रयोग करताना वाहतूक कोंडी झाली. मात्र मंगळवारी याठिकाणी वाहतूक सुरळीत चालू असल्याचे चित्र दिसले. या नव्या प्रयोगाची शहरातही चर्चा होती. या चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले असून, पादचाºयांनाही रस्ता सुरक्षित केला असून, वाहनांना एका विशिष्ट रेषेपर्यंत थांबण्याच्या सूचना मिळाल्याचे संकेत आहे. थोडा फार वाहनधारकांना त्रास वाटला; परंतु वाहने अधिक काळ सिग्नलवर (ग्रीन सिग्नल) ची वाट न पाहता मार्गक्रम करता आले.
एकाच वेळी दोन्ही बाजूच्या वाहनांना पुढे जाण्याची संधी मिळत असल्याने अनेकजण पोलिसांकडे हात उंचावून अंगठा दाखवून प्रयोग चांगला असल्याची पावती दिली. काही नागरिकांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांना भ्रमणध्वनीवरदेखील शुभेच्छा दिल्या.
जीवघेणा धोका टळला
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हा पहिलाच प्रयोग या चौकात वापरल्याने वनवे वाहने तसेच नियमानुसार दोन्ही वाहतूक एकाच वेळी देखील सुरू केल्याने चौथा सिग्नलचा नंबर येईपर्यंत चालक वैतागलेला दिसतो. त्याच परिस्थितीत तो मध्येच घुसून सिग्नल तोडत निघून जातो, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
त्यावर तोडगा म्हणून वाहतूक शाखेने पहिले पाऊल उचलून आगळावेगळा प्रयोग केला. सोमवारी फक्त दोºया लावून वाहनांना सुरळीत करण्याचा प्रत्यन केला होता; परंतु मंगळवारी या प्रयोगाला प्रारंभ झाला अन् सिग्नलच्या गर्दीतून लवकर सुटका झाल्याने प्रत्येक वाहनचालक खुश दिसत होता.
दुसरे सिग्नलदेखील लवकर सुरू करा...
४जास्त काळ सिग्नलवर वेळ वाया गेला नाही; परंतु इतर सिग्नलवर थांबावे लागले. दूध डेअरी सिग्नलवर केलेला प्रयोग इतर सिग्नलवर देखील करावा, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून व्यक्त होताना दिसल्या.
दुसºया चौकाचा विचार करू...
सिग्नलवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केलेला प्रयोग पहिल्याच दिवशी यशस्वी ठरताना दिसतो आहे. ११ वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी देखरेखीवर असून, फिक्स पॉइंट करून या प्रयोगाची दुसºया चौकात अंमलबजावणी करू, असे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले.