शेतक-यांची लूट; ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:26 IST2018-01-12T23:26:15+5:302018-01-12T23:26:18+5:30
परवाना देताना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामकाज न करणे, परवान्यातील अटी-शर्थीचे उल्लंघन करणे व शेतकºयांच्या मालाला योग्य भाव न देता शेतकºयांची लूट करणे असा ठपका ठेवून महावीर ट्रेडिंग कंपनी या नावाने असलेला महावीर शांतीलाल गंगवाल यांचा परवाना पणन संचालक पुणे यांनी निलंबित केला आहे.

शेतक-यांची लूट; ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित
कन्नड : परवाना देताना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामकाज न करणे, परवान्यातील अटी-शर्थीचे उल्लंघन करणे व शेतकºयांच्या मालाला योग्य भाव न देता शेतकºयांची लूट करणे असा ठपका ठेवून महावीर ट्रेडिंग कंपनी या नावाने असलेला महावीर शांतीलाल गंगवाल यांचा परवाना पणन संचालक पुणे यांनी निलंबित केला आहे. या अर्जावर २० जानेवारी २०१८ रोजी सुनावणी होणार आहे, मात्र तोपर्यंत परवाना निलंबित करीत असल्याचा आदेश पणन संचालकांनी दिला आहे.
आजपासून लिलाव सुरु
बंद पडलेला मक्याचा लिलाव आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. जास्तीत जास्त शेतकºयांनी मका आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र मगर यांनी केले आहे.