सीलिंग जमिनीच्या व्यवहारांचे दस्तावेज घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:40 IST2017-09-26T00:40:23+5:302017-09-26T00:40:23+5:30
जिल्ह्यातील भोगवटादार वर्ग २ व कुळ, सीलिंग, इनाम, गायरान, महार हाडोळा व इतर जमिनीच्या सर्व व्यवहारांचे दस्तावेज विभागीय आयुक्तालय प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत.

सीलिंग जमिनीच्या व्यवहारांचे दस्तावेज घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील भोगवटादार वर्ग २ व कुळ, सीलिंग, इनाम, गायरान, महार हाडोळा व इतर जमिनीच्या सर्व व्यवहारांचे दस्तावेज विभागीय आयुक्तालय प्रशासनाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. मागील तीन वर्षांतील व्यवहारांची चौकशी समितीमार्फत करण्यात येणार आहे.
भोगवटादार-२ च्या जमिनीची विक्री परवानगी वगळता अन्य सर्व प्रकरणांच्या मूळ संचिका यादीसह चौकशीसाठी मागविण्यात आल्या असून, जिल्हा प्रशासनाने सर्व गठ्ठा सुपूर्द केला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व प्रकरणांत जिल्हाधिकाºयांशिवाय इतर कोणत्याही अधिकाºयांनी काहीही निर्णय घेऊ नये, असे आदेश विभागीय आयुक्तांनी जारी केले आहेत. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
सीलिंगच्या व्यवहाराबाबतचे सर्व अधिकार भूसुधार उपजिल्हाधिकारी यांना असताना मागील वर्षभरात २५० हून अधिक प्रकरणांना विक्रीसाठी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाºयांना डावलून स्वत:च्या स्वाक्षरीने सुमारे २५० परवानग्या देण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा जिल्हा प्रशासकीय वर्तुळात जून महिन्यापासून सुरू आहे. विभागीय आयुक्तांकडे एका तक्रारकर्त्याने जिल्हाधिकाºयांच्या स्वा़क्षरीविना काही व्यवहारांना मान्यता दिल्याचे म्हटले आहे.