आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू प्रकरण विधिमंडळात, श्रीकांत देशपांडे यांची लक्ष्यवेधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:50 PM2017-12-03T20:50:08+5:302017-12-03T20:50:29+5:30
अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
अमरावती : शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध कारणांनी झालेले मृत्यू प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. आ. श्रीकांत देशपांडे यांनी लक्ष्यवेधी सादर केली असून आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे.
सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षात संर्पदंश, आजार, संस्थाचालकांचे दुर्लक्ष, सोयी-सुविधांचा अभाव, अवेळी औषधोपचार आदी कारणांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आश्रमशाळा, वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा, शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन अनुदान देते. मात्र, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची मालिका सातत्त्याने सुरू असल्याचे लक्ष्यवेधीतून आ. देशपांडे यांनी मांडली. ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्थ आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या, मृत्यूची कारणमीमांसा, दोषींवर कारवाई, पोलिसात तक्रार आदी बाबी लक्ष्यवेधीतून मांडण्यात आल्यात. विशेषत: ५२२ अनुदानित तर ५५४ शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रशासकीय अनास्थेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. आ. देशपांडे यांनी सादर केलेल्या लक्षवेधीची माहिती सभागृहात वेळीच प्राप्त व्हावी, यासाठी विधिमंडळ कामकाज सचिवालयांनी आदिवासी विकास विभागाच्या चारही अपर आयुक्तांना त्यांच्या अधिनस्थ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती पाठविण्याच्या सूचना प्रत्राद्वारे दिल्या आहेत.
अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलचा मुद्दा गाजणार
अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कुलमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाºया रोशन सावलकर या आदिवासी विद्यार्थ्याचा प्रदीर्घ आजाराने ३ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाल्याचे प्रकरण विधिमंडळात गाजणार आहे. संस्थाचालकांच्या दुर्लक्षाने आदिवासी विद्यार्थ्यांवर वेळीच उपचार होऊ शकला नाही, असे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हादेखील दाखल केला आहे. याप्रकरणी लक्ष्यवेधी सादर केल्याचे आ. श्रीकांत देशपांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.