विद्युत टॉवर कोसळला; दोन ठार, एक गंभीर
By Admin | Updated: January 10, 2015 22:46 IST2015-01-10T22:46:04+5:302015-01-10T22:46:04+5:30
विद्युत टॉवरचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरचा भाग कोसळल्याने झालेल्या अपघातात टॉवरवर काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला.

विद्युत टॉवर कोसळला; दोन ठार, एक गंभीर
अमरावती : विद्युत टॉवरचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरचा भाग कोसळल्याने झालेल्या अपघातात टॉवरवर काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सायकांळी ६.३० वाजतादरम्यान मोर्शी ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरखेड येथे घडली.
सुदामा मेंमा यादव (१९,रा. फराइनबाद, छत्तीसगड), अमर महेंद्र सास (२६, रा.करडी, झारखंड)अशी मृतांची नावे आहेत.ललित साय (२३, रा. झारखंड) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी विद्युत टावर बांधणीचे काम सुरु असताना अचानक टॉवरचा वरील भाग कोसळल्याने तीन कामगार खाली कोसळले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, दोघांचा मृत्यू झाला.
जखमी ललितवर उपचार सुरु आहेत. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.