खोलापूरनजीक विद्युत पोल लोंबकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:49 IST2018-05-07T22:49:44+5:302018-05-07T22:49:44+5:30
दर्यापूर-अमरावती मार्गावरील खोलापूरजवळ शेतात विद्युत पोल लोंबकळले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर विद्युत पोल तेथून हटवावे, अशी मागणी होत आहे. परंतु, याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे.

खोलापूरनजीक विद्युत पोल लोंबकळले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावरील खोलापूरजवळ शेतात विद्युत पोल लोंबकळले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर विद्युत पोल तेथून हटवावे, अशी मागणी होत आहे. परंतु, याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे.
खोलापूर उपविभागांंर्गत सदर विद्युत वाहिनी गेली आहे. याची माहिती नाही. परंतु, या ठिकाणी अनेक विद्युत पोल झाडाच्या फांद्यांमध्ये अडकले आहेत. काही विद्युत तारा लोंबकळल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या भरधाव वाहनांवर सदर पोल पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुख्य अभियंता वीज वितरण कंपनी यांनी लक्ष घालून सदर समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.