संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव, आंबेडकरी संघटनेनं केलं २६ नोहेंबर रोजीच संविधान दिन साजरा करण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 20:42 IST2017-11-25T20:41:49+5:302017-11-25T20:42:03+5:30
संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संविधान दिनाचे महत्त्व कमी करण्याचा डाव, आंबेडकरी संघटनेनं केलं २६ नोहेंबर रोजीच संविधान दिन साजरा करण्याचं आवाहन
अमरावती : संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करावा. सरकारने २७ नोव्हेबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली आहे. हा जातीवादी व समाजात फुट पाडण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त होत आहे.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान २६ नोव्हेंबर रोजी लागू झाले. लोकशाही याच दिनी आमलात आली, यामुळे २६ नोव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र राज्य सरकारने २६ नोव्हेंबर रोजी रविवार येत असल्यामुळे संविधान दिन २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याची अधिसूचना काढली. त्यामुळे या दिनाचे महत्व कमी करण्याचा डाव हा जातीवादी असल्याचा आरोप बहुजन समाजाने केला आहे. या विरोधात याचा तीव्र असंतोष आंबेडकरी समाजात उमटत असून दलित समाजाने याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
शासनाच्या असा निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते यामुळे असे अविचारी निर्णय सरकारने घेऊ नये. संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजीच संविधान दिन साजरा करावा असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सागर भवते यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात महान संविधान आहे. याचा विसर सरकारला पडला असावा. संविधान जर नसत तर भारतात लोकशाही अस्तित्वात नसती हे विसरून चालणार नाही.
- सिद्धांर्थ मुद्रे, आंबेडकरी प्रचारक, तिवसा
या निर्णयामुळे भाजपा सरकारचे पितळ उघडे पडले असून आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मान्य नाही. या दीनाचे महत्व त्यांना कमी करण्याचे आहे म्हणून हा डाव आहे
- प्रशिक मकेश्वर, अध्यक्ष, फुले,शाहू,आंबेडकर युवा विचार मंच, तिवसा