राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २५, २६ नोव्हेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:59 IST2017-10-17T01:59:17+5:302017-10-17T01:59:46+5:30
गेल्या पाच वर्षांपासून अकोला महानगरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रेमी एकत्र येऊन या संमेलनाचे थाटात आयोजन करीत असतात. पाचवे संमेलन जगाचा पोशिंदा बळीराजाला सर्मपित राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष लवकरच घोषित करण्यात येणार आहेत.

राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन २५, २६ नोव्हेंबरला
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी विचार साहित्य संमेलन अकोला येथील स्वराज्य भवन येथे संपन्न होणार आहे. यासंदर्भातील बैठक नुकतीच आयोजन समितीच्या हर्ष संकुल येथे पार पडली. गेल्या पाच वर्षांपासून अकोला महानगरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रेमी एकत्र येऊन या संमेलनाचे थाटात आयोजन करीत असतात. पाचवे संमेलन जगाचा पोशिंदा बळीराजाला सर्मपित राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष लवकरच घोषित करण्यात येणार आहेत.
संमेलनाच्या नियोजनासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला डॉ. प्रकाश मानकर, रामेश्वर बरगट, अँड. संतोष भोरे, प्रा. हरिदास गहूकर, अँड.वंदन कोहाडे, प्रा. डॉ.राजीव बोरकर, गोपाल गाडगे, श्रीपद खेडकर, राजेंद्र झामरे, रामराव पाटखेडे, जयंत इंगोले, तुळशीराम लोथे, डॉ. रामेश्वर लोथे,चंद्रशेखर चतारे, प्रमोद शेंडे, राजेश फाले, तुषार बरगट, अनिकेत तायडे, आकाश हरणे इत्यादींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.